प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया म्हणजे ( PTI ) या वृत्तसंस्थेच्या नागपुर येथील प्रतिनिधी श्री चार्ल्स साल्वे यांच्या घरावर चार ते पाच गुंडानी मंगळवारी राञी 12 ते 1 .00 वाजताच्या दरम्यान हल्ला केला असून त्यांना जिवे मारण्याची धमकी सुध्दा देण्यात आली . पीटीआय’चे पत्रकार श्री चार्ल्स साल्वे यांना प्रथम दर्शनी ते चोर असल्याचे वाटले. मात्र, त्याने दरवाजा तोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा न तुटल्याने व साल्वे यांनी आपल्या परिसरात नागरीकांना जोरजोरात आवाज देऊन आेरडा - आेरड केल्याने ते काही वेळाने पळून गेले .तसेच नागपुर सदर पोलीसही उशिरा आल्याने गुंडाला पकडण्यात अपयश आले. गुंडाचा चेहरा सिसिटीव्हीमध्ये आला आहे. मात्र नागपुर सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करून 24 तास होउनही पोलीस विभाग अजूनही गुंडाला पकडू शकले नाही. राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले अजून किती दिवस सहन करायचे हा प्रश्न सर्वांनाच पडलेला असल्यामुळे पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्रने हल्लेखोरांचा , शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....