Skip to main content

Posts

Showing posts from October 8, 2017

मालेगाव रत्न पुरस्काराने विनोद पञे यांचा गौरव

मालेगाव शहरातील जे. जे. न्युज चॅनेलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील विविध श्रेञातील 26 जणांना मालेगाव रत्न पुरस्कार देऊन शनिवार 7 आॅक्टोबर 2017 रोजी गौरव करण्यात आला .  पञकार संरक्षण समिती व महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपञ पञकार असोसिएशनच्या माध्यमातून राज्यातील विविध पञकारांची कामे , पञकाराचे प्रश्न अशी विविध कामे पञकार संरक्षण समितीचे संस्थापक / अध्यक्ष श्री विनोद एन. पञे यांना मा. श्री दादाजी भुसे , राज्यमंञी ग्रामीण विकास यांच्या हस्ते मालेगाव रत्न पुरस्कार देऊन मालेगाव येथे गौरव करण्यात आला .