सगरोळी प्रतिनिधी :- नाशिक जिल्ह्यातील जेष्ठ पञकार श्री राम खुर्दल यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पञकार संरक्षण समिती बिलोलीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राज्यात पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू होऊन काही महिने झाले असुन सुध्दा पत्रकारांवरील हल्ले काही थांबायला तयार नाहीत. याचे प्रत्येय नुकतेच नाशिक जिल्ह्य़ातील गुरनारे या ठिकाणी श्री राम खुर्दल या जेष्ठ पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यातुन दिसुन येते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन समाजातील तळागाळातील जनतेच्या मुलभूत गरजा लक्षात घेऊन आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत निस्वार्थपणे हक्क मिळवून देण्याचे काम करतो. परंतु समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या विकृत मानसांनी पत्रकारांवर सततचे हल्ले करून मानसिकता दाखवतात. याच मानसिकतेतून जेष्ठ पत्रकार श्री राम खुर्दल यांच्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे शिक्षण सभापती व कार्यकर्ते यांनी मारहाण करून खुर्दल यांचे हात फ्रॅक्चर केले आहे. याला शासनाने पाठीशी का घालते? असा प्रश्न राज्यातील तमाम पत्रकारांना पडला आहे. असे ...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....