Skip to main content

Posts

Showing posts from August 19, 2017

गावातील पत्रकारांचे संरक्षण ही गावाची जबाबदारी.

अखिल भारतीय पत्रकार संरक्षण समिती, प्रतिनिधी: -  पत्रकार हा ग्रामविकासाचा मूळ दुवा आहे,ग्रामीण पत्रकार सध्यस्थितीत जास्त असुरक्षित आहे, कारण ते बातमी साठी समाजात, कार्यक्षेत्रात जावून बातमी मिळवतात,चित्रीकरण करतात,अत्यंत निस्वार्थी वृत्ती ,निरपेक्षपणे हे पत्रकार कार्यरत असतात,स्वखर्चातुन घरादारावर तुळशीपत्र ठेवून ही मंडळी वृतांकणासाठी जीवाचे रान करतात,अश्या पत्रकांराच्या माध्यमातून अनुभवातूनच ग्रामविकास होतो, हे स्थनिक ग्रामपंचायत प्रतिनिधी,आधीकारी,गावकरी,राजकीय,सामाजिक मंडळे ,संस्था यांनी जाणले पाहिजे,सातत्याने गावाच्या प्रश्नावर जागृती करणाऱ्या पत्रकारांवर राजकीय व गाव गुंडाकडून,दारूमाफिया,वाळू माफिया या कडुन जीवघेण्या दमदाटया,हल्ले होतात ही प्रकरणे अधिक वाढत आहेत,पत्रकार हा गावचा आरसा गावच्या विकासाचा केंद्र आहे,अश्या पत्रकारांवर गाव पातळीवर हल्ले होत असतील तर लोकांनी सत संत विवेकबुद्धी जागी ठेवून पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे ,वाईट प्रसंगात साथ दिली पाहिजे, मात्र केवळ वरवरची प्रयत्न होतात, हल्ला झाल्यास पत्रकार एकटे पडतात, हे दुर्दैव नाही तर काय आहे अहो गावासाठी झटणारे पत...