मी स्वत - पासून सुरूवात करतो. राजकारण्यावर वारंवार टिका करण्याचा जन्मसिद्ध अधिकार लाभलेला मी पत्रकार. पत्रकारितेत मी काय करतोय, हे मी जाणून घ्यायला हवं. मला नुकतेच एक मंत्री महोदय भेटले. सध्याच्या पत्रकारितेवर बोलताना ते म्हणाले, ''तुम्ही मीडियावाले... आठवी-नववी शिकलेली पोरं. एक दंडुका हातात घेता आणि आम्हाला जाब विचारता. तुमच्याकडे किती नाॅलेज आहे हे अगोदर तपासता का ?'' त्यांचा हा प्रश्न बरोबर आहे. माहिती नसतानाही अर्धे हळकुंडाने पिवळे झालेले पत्रकार, ४० वर्षे राजकारणात घालवलेल्या नेत्याच्या विरोधात बातमी देताना नक्कीच आपली पण तेवढी पात्रता आहे का, हे तपासायला हवं. पाॅलिटीकल रिपोर्टरचं नेमके काय काम असतं. अनेकजण राजकीय बातमीदारी करतात. म्हणजे नेमकं काय करतात ? राजकारण्यांच्या पुढे मागे फिरणं.. राजकीय नेत्यांसोबत फोटो काढणं... किंवा हांजी हांजी म्हणत एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या दावनीला बांधून घेणं. काय असते राजकीय पत्रकारिता. आपण खूप काहीतरी वेगळ्या ग्रहावरचे आहोत, असा जर कोणात्या पत्रकाराचा समज असेल तर त्यांनी एकदा दिल्लीच्या जंतर मंतर इथं जाऊन एक फेरफटका मारून य...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....