Skip to main content

Posts

Showing posts from August 5, 2017

शिवसेना आमदार श्री राजेश क्षीरसागर यांचे आभार

सर्वप्रथम शिवसेना  आमदार श्री  राजेश क्षीरसागर यांना पञकार संरक्षण समितीच्या वतीने  मानाचा मुजरा तथा स्नेही जय महाराष्ट्र !! मुंबई  - समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता लोकांपर्यंत बातमीद्वारे सविस्तर माहिती पोहचविणाऱ्या पत्रकार बंधू भगीनिना इतर राज्यामध्ये निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येतो, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ही सुविधा लागू नसल्याने पत्रकारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली. या बाबी कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला..यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यां...