Skip to main content

शिवसेना आमदार श्री राजेश क्षीरसागर यांचे आभार

सर्वप्रथम शिवसेना  आमदार श्री  राजेश क्षीरसागर यांना पञकार संरक्षण समितीच्या वतीने  मानाचा मुजरा तथा स्नेही जय महाराष्ट्र !!

मुंबई  - समाज व्यवस्थेचा चौथा खांब म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. दैनंदिन घडामोडी, विशेष बातम्या, माहिती, शासनाच्या योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसिद्धीमाध्यमांकडून केले जाते. त्याचमुळे समाजामध्ये पत्रकारांना विशेष असे स्थान प्राप्त झाले आहे. प्रसंगी ऊन, वारा, पाउस यांची तमा न बाळगता लोकांपर्यंत बातमीद्वारे सविस्तर माहिती पोहचविणाऱ्या पत्रकार बंधू भगीनिना इतर राज्यामध्ये निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येतो, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये ही सुविधा लागू नसल्याने पत्रकारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली. या बाबी कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधीमंडळात औचित्याचा मुद्दा उपस्थित केला..यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, विविध राज्यात पत्रकारांना निवृत्ती वेतन दिले जाते. यामध्ये कर्नाटकमध्ये आठ हजार, गोवामध्ये दहा हजार, हरियाणामध्ये आठ हजार, केरळमध्ये दहा हजार अशी पेन्शन दिली जाते. उत्तर प्रदेश राज्यात पत्रकार वेलफेअर सोसायटीची स्थापना करून तेथील राज्य सरकारने पत्रकारांना खास निवृत्ती वेतनाचे नियोजन केले आहे. तामिळनाडूमधेही पेन्शन देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र अशी कोणतीही योजना नाही आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचे जाहीर केले होते. मात्र, आजतागायत त्याची पूर्तता झाली नसल्याने पत्रकारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांनाही त्यांच्या हक्काची पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली..*
ते पुढे म्हणाले कि, पत्रकारांना बातम्या गोळा करण्यासाठी ग्रामीण भाग व जिल्ह्यासह इतरत्र राज्यातही फिरावे लागते. त्यावेळी त्यांना अनेकवेळा टोल नाक्यावर टोल भरावा लागतो. सदर टोल नाक्यांवरही पत्रकारांना टोलमाफी देण्याबाबत शासनाने सत्वर निर्णय घ्यावा, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार राजेश क्षीरसागर यांनी संबधित मंत्रीमहोदयांकडे केली त्याबद्दल पञकार संरक्षण समिती , महाराष्ट्र तथा राज्यातील पञकारांच्या वतीने आपले धन्यवाद !!!

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...