बिड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये लाठीमार आपल्या कॅमेरामध्ये कैद करणाऱ्या पत्रकार श्री मिलिंद चोपडे आईवर शिवीगाळ करणारी खाकी पाहून तर आज पत्रकाराच्या आईची कीवच आली . म्हणजे पत्रकार जन्माला घालून त्या माउलीने जणू पाप केले नाहीतर पत्रकाराच्या आईला कशाला शिवी दिली असती . पत्रकाराची गचांडी पकडून पोलीस त्यास गाडीत घेऊन जात असताना पोलीस म्हणत होते , तुज्या आईचा ...... तुज्या आईचा ..... आणि तुज्या आईचा.....जगाचे भले करताना आपल्या लेखणीची धार लावणाऱ्या पत्रकारास त्याच्या आईला दोन शब्दाचा सन्मान देता येऊ नये ...... पञकार मिलिंद चोपडे यांना न्याय मिळावा तसेच हल्ला करणारा पोलिस निलंबित व्हावा याकरीता पञकार संरक्षण समिती माजलगांव कार्यकारणी कडून तहसिदार मार्फत मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले .
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....