Skip to main content

Posts

Showing posts from August 29, 2017

मुंबईतील पत्रकारांना पञकार संरक्षण समितीचा सलाम

महाराष्ट्रात  राज्याची राजधानी मुंबईत  काल  विक्रमी पाऊस झाला, अद्यापही सुरू आहे.  अतिरेकी हल्ल्यासारखी मानव निर्मित अपत्ती असो की पावसासारखी नैसर्गिक अपत्ती प्रशासनाच्या पुढे दोन पावले जाऊन वार्तांकनासाठी आपले पत्रकार बांधव सज्ज असतात.  आजही आपले जे पत्रकार बांधव जीवाची बाजी लावून मुंबईतील पावसाच्या बातम्या देत आहेत, त्यांच्या धाडसाला सलाम. पत्रकारांवर एरवी बेच्छूट आरोप करणाऱ्यांनी, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्यांनी हल्ले करणाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून हे दृष्य पहावे.  तुम्हाला घरबसल्या पावसाची जी खबरबात मिळते आहे, ती आमच्या रस्त्यावर उतरून जीव धोक्यात घालून लढणाऱ्या पत्रकारांमुळे, आता तरी पत्रकारांना ओळखा, त्यांच्याही जीवाचा, त्यांच्याही हक्काचा, सोयीसुविधांचा विचार करा . आपल्या सर्व  पत्रकारांना पञकार संरक्षण समितीच्या वतीने  मनापासून सलाम