कोणा पत्रकाराला ठार मारण्यात आले की त्या पुढील ७२ तास मिडियातल्या "चमको पत्रकारांना" निषेध व्यक्त करायची आयती संधी मिळते आणि त्या संधीचा हे "चमको पत्रकार" पुरेपुर वापर करून घेतात. कटू आहे पण हेच सत्य आहे. एरवी एखाद्या पत्रकाराला मारहाण झाली, त्याच्यावर अन्याय झाला की तो ज्या संस्थेत कार्यरत आहे ती वृत्तसंस्था सोडून तर इतर वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था त्याची जाणूनबूजून दखल घेत नाहीत. त्याबद्दल बातमी दाखवत नाहीत. राजकीय क्षेत्रापेक्षा बरबटलयं हे क्षेत्र.. वृत्तसंस्थाच्ये टीआरपी च्या खेळात सामान्य पत्रकारांची अक्षरशः ससेहोलपट होत आहे. कोणा राजकीय व्यक्तीवर हल्ला वगैरे झाला तर सर्व राजकारणी पक्षभेद विसरून एकत्र येतात.. एकीचे बळ त्यांना चांगलेच माहित आहे.परंतु जगाला शाळा शिकविणार्या पत्रकारांना हे कळूनही वळत नाही हेच दुर्दैव आहे. सामान्य बातमीदाराने एखादी महत्वाची बातमी पुराव्यानिशी पाठवली आणि नेमकं त्याच वेळी एखाद्या सेलिब्रेटीला साधी शिंक जरी आली की ती "BREAKING NEWS" होते आणि टीआरपीच्या हव्यासासाठी त्या बातमीदाराने जीवावर खेळून तयार केलेली ...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....