देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या आयोगाचा आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यामुळे तर वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका तसेच नोटबंदीचा फटका बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...
पेनानी गळा कापण्याची कला तुम्हाला अवगत होती , तुम्ही गेल्यावर हे आमच्या लक्षात आलं ....