Skip to main content

Posts

Showing posts from July 24, 2017

पासपोर्टसाठी जन्म दाखल्याची सक्ती नाही

वृत्तसंस्था -  यापुढे पासपोर्टसाठी जन्म दाखला आवश्यक नसल्याचे सरकारतर्फे संसदेत माहिती देताना परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. पासपोर्ट नियम १९८० नुसार २६ जानेवारी १९८९ नंतर ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना पासपोर्टसाठी जन्माचा दाखला देणे अनिवार्य होते. परंतू यापुढे त्यांना हा नियम लागू होणार नाही. ते जन्मतारखेसाठी शाळेचा दाखला, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, एलआयसी पॉलिसी बॉण्ड या कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करु शकतात. तर सरकारी कर्मचारी हे सर्व्हिस रेकॉर्ड, पेन्शन रेकॉर्ड हे देखील सादर करु शकतात, असे संसदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सिंह यांनी याबाबत माहिती दिली. देशातील लाखो लोकांना सोप्या पद्धतीने पासपोर्ट उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सिंह यांनी सांगितले. तसेच ६० वर्षापेक्षा कमी आणि आठ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना पासपोर्टसाठीच्या अर्जदारांना पासपोर्टसाठी आकारल्या जाणा-या फी वर १० टक्के सूट मिळणार आहे. पासपोर...