अखिल भारतीय पत्रकार संरक्षण समिती,
प्रतिनिधी: -
पत्रकार हा ग्रामविकासाचा मूळ दुवा आहे,ग्रामीण पत्रकार सध्यस्थितीत जास्त असुरक्षित आहे, कारण ते बातमी साठी समाजात, कार्यक्षेत्रात जावून बातमी मिळवतात,चित्रीकरण करतात,अत्यंत निस्वार्थी वृत्ती ,निरपेक्षपणे हे पत्रकार कार्यरत असतात,स्वखर्चातुन घरादारावर तुळशीपत्र ठेवून ही मंडळी वृतांकणासाठी जीवाचे रान करतात,अश्या पत्रकांराच्या माध्यमातून अनुभवातूनच ग्रामविकास होतो, हे स्थनिक ग्रामपंचायत प्रतिनिधी,आधीकारी,गावकरी,राजकीय,सामाजिक मंडळे ,संस्था यांनी जाणले पाहिजे,सातत्याने गावाच्या प्रश्नावर जागृती करणाऱ्या पत्रकारांवर राजकीय व गाव गुंडाकडून,दारूमाफिया,वाळू माफिया या कडुन जीवघेण्या दमदाटया,हल्ले होतात ही प्रकरणे अधिक वाढत आहेत,पत्रकार हा गावचा आरसा गावच्या विकासाचा केंद्र आहे,अश्या पत्रकारांवर गाव पातळीवर हल्ले होत असतील तर लोकांनी सत संत विवेकबुद्धी जागी ठेवून पत्रकारांना संरक्षण दिले पाहिजे ,वाईट प्रसंगात साथ दिली पाहिजे, मात्र केवळ वरवरची प्रयत्न होतात, हल्ला झाल्यास पत्रकार एकटे पडतात, हे दुर्दैव नाही तर काय आहे अहो गावासाठी झटणारे पत्रकार असुरक्षित असतील तर गावाचे भविष्य पारतंत्र्यात ठेवणार काय?ही लोकशाही नाही, गावाच्या पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणारे गाव खऱ्या अर्थाने जागृत गाव असते,अश्या निराधार असुरक्षित पत्रकारांचे संरक्षण गाव करीत नसेल तर आम्ही त्यासाठी सक्षम आहोत,आम्ही हल्लेखोरांशी प्रसंगी कायद्याने दोनहात करू,नाहीतर आमची शक्तीस्थाने आहेतच, हेच धोरण सोबत घेऊन पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती,जर्नालिष्ठ एकटीविझम फोरम कार्य करणार आहे,असे एकमुखी ठराव करण्यात आले आहे,
पत्रकारांवर हल्ल्याचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेऊन गट तट सोडून पत्रकार संघटना एकत्रित येऊन, "मी पत्रकार" म्हणून संघटित होऊन पत्रकार हक्क अधिकारासाठी एकमुखी वज्रमुठ बांधावी,पत्रकारांच्या जीवावर उठलेल्या हल्लेखोरांना शिक्षा दंड व्हावा म्हणून पत्रकार संरक्षणाचा कायदा अस्तित्वात आला आहे, महाराष्ट्र प्रसारमाध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्ये व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) विधेयक, २०१७’ असे या विधेयकाचे नाव आहे.
दोन्ही सभागृहांत हे विधेयक कोणत्याही चर्चेशिवाय एकमताने संमत करण्यात आले,विधेयकात प्रसारमाध्यमातील व्यक्तींवर हल्ले तसेच हिंसाचार करणाऱ्या व माध्यम संस्थांच्या मालमत्तेची हानी करणाऱ्या किंवा यापैकी काही करण्यास चिथावणी देणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांचा कारावास किंवा रुपये ५० हजाराचा दंड करण्याची तरतूद आहे प्रत्येक गावातील पत्रकारांचे संरक्षण ही त्या गावतील नागरिकांची,पोलिसांची,लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे हे विसरता कामा नये,
प्रशांत कांबळे,दादाजी पगारे असो की राम खुर्दळ असे अनेक पत्रकार आयुष्यभर समाजात सातत्यांने पत्रकारिता करतात,सामाजिक जाणिवा ठेवून कार्यरत पत्रकारांवर जीवघेणे हल्ले,अपघात,खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या प्रसंगात त्यांची साथ देण्यासाठी आता अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती,पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,जर्नालिष्ठ एकटीविझम फोरम आता सक्षमपणे संघर्ष करणार आहे,असे या संघटनांचे प्रमुख सतीश रुपवते,
विनोद पत्रे, अनिल चौधरी , नंदकिशोर धोञे , योगेश कांबळे,दादाजी पगारे,मायाताई खोडवे,जेष्ठ पत्रकार कुमार कडलंग सर यांनी निर्धार केला आहे.
Comments