सदरक्षनाय आणि खलनिग्रहनाय असे ब्रीद घेऊन खाकीचा सृजनशील समाज रक्षणाचा आणि त्यातील गुंडप्रवृतिच्या निर्वाहाचा वसा पोलिसांनी घेतला आहे . प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य यात ताळमेळ राखून पगार घेऊन काम पोलीस करतात . मात्र हे करताना संविधानाने निर्धारित केलेल्या कायदा अन नियमाचे बंधन सर्वांना समान ठेवले आहे .
अलीकडे पोलीस प्रशासकीय सेवेतील काही लोक कायदा हातात घेताना थेट खाकीच्या प्रतिमेला डागाळत असल्याचे निरक्षण अलीकडच्या काळात पाहायला मिळत आहे . दिनांक २८ रोजीची घटना त्याची साक्ष देते .
बिड जिल्ह्यातील माजलगाव मध्ये लाठीमार आपल्या कमेरयात कैद करणाऱ्या पत्रकारास आईवर शिवीगाळ करणारी खाकी पाहून तर आज पत्रकाराच्या आईची कीवच आली . म्हणजे पत्रकार जन्माला घालून त्या माउलीने जणू पाप केले नाहीतर पत्रकाराच्या आईला कशाला शिवी दिली असती . पत्रकाराची गचांडी पकडून पोलीस त्यास गाडीत घेऊन जात असताना पोलीस म्हणत होते , तुज्या आईचा ...... तुज्या आईचा ..... आणि तुज्या आईचा.....जगाचे भले करताना आपल्या लेखणीची धार लावणाऱ्या पत्रकारास त्याच्या आईला दोन शब्दाचा सन्मान देता येऊ नये याचा एक पत्रकार म्हणून अतीव खेद वाटतो , सुमनताई माफ करा ,तुमचा लेक पत्रकार असल्यामुळे त्या पोलिसाने तुमची कूस काढली .
कलेक्टर , एस पी , डॉक्टर , इंजीनियर जन्माला घालणाऱ्या माउली ला किती सन्मान आपण देतो नाही का , भरगच्च पगार , नौकर चाकर आणि रुबाब कमावणाऱ्या लेकाचा सर्वांना स्वाभिमान अभिमान असतो .
मात्र आयुष्याचे भांडवल करून जीव धोक्यात घालून अन्यायाच्या विरोधातील आवाजाला आपल्या लेखणीतून बळ देणाऱ्या पत्रकाराला जन्म देणाऱ्या मातोश्रीचा कुणी सन्मान करणार आहे का , ग्रामीण भागातील पत्रकार तर जाहिरातीतील कमिशन शोधून एक दमडी देखिल कमावत नाही त्याच्या आईने कुठले पाप केलेले असते म्हणून तिचा लेक पत्रकार झाला . पत्रकार समाजाला बातम्या देतो , माहिती पुरवतो , पैसे तर कमावतच नाही वरून आईला कुठला सन्मान मिळवून देत नाही , उलट पोलीस त्यास त्याचे समाजउपयोगी काम करताना मारतात खूप मारतात आणि प्रत्येक फटक्यागणीक आई वर शिव्या देतात , त्या पत्रकाराच्या आईचा काय गुन्हा असतो म्हणून तिला शिव्या दिल्या जातात .
शुटींग काढतो म्हणून मिलिंद चोपडेंना पोलिसांनी पकडले आणि फटके दिले वरून त्यांच्या आईवर म्हणजे सुमनबाई बन्शीलाल चोपडेवर शिव्या देण्याचा पोलिसांना कुणी परवाना दिला . एकप्रकारे तो स्त्रीच्या विनयाचा भंग नाही काय ? *समाज जागा ठेवण्यासाठी आपल्या लेखणीची छत्री तर अन्यायाचा बीमोड करताना लेखणीची समशेर करणारा पत्रकार , गरिबावर कुठला अन्याय झाला त्याच्यासाठी संघर्षाचा धागा बनणारा पत्रकार , महिलेवर अन्याय झाला तर तिचा भाऊ बणून तिची सुरक्षा करणारा पत्रकार , कमी पगार घेऊन राबणारा जीव धोक्यात घालून भृष्टाचार बाहेर काढणारा पत्रकार , घरी लेकरे बायको एकटी झोपवून रात्रीच्या दोन वाजेपर्यंत डोळे फोडणारा पत्रकार , अन्यायी जुलमी शक्तीशी लढताना जीव धोक्यात घालणारा पत्रकार , भाड्याच्या घरात जीवन घालणारा पत्रकार , मुलीच्या लग्नाला उसने पैसे घेणारा अन आयुष्यभर फेडत बसणारा पत्रकार , आमच्या माई ने कुठले पाप केले होते म्हणून आम्ही तिच्या पोटाला जन्म घेतला
कारण आम्ही तिला मखमल देऊ शकत नाही , तीर्थयात्रा करवू शकत नाही किमान सन्मान तरी देऊ शकतो का ?

Comments