Skip to main content

माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना मदत .. - मुख्यमंत्री



मुंबई -   आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे फलक, बॅनर्स लावू नयेत तसेच जाहिराती प्रकाशित करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त ज्यांना योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खास सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात योगदान द्यावे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस असून यावर्षीही त्यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये. तसेच अभिष्टचिंतनासाठी भेटायला येणाऱ्यांनीही पुष्पगुच्छ, हार-तुरे आणण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. महाराष्ट्र  शासनाने शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आहे.
 या कर्जमाफीसाठी शासनाला आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी (CM Farmers Relief Fund) या नावाने स्वतंत्र खाते उघडले असून त्याचा खाते क्रमांक 36977044087 असा आहे.
 स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत हे खाते असून तेथे धनादेश, डीमांड ड्राफ्ट किंवा रोखीने आपले योगदान देता येईल.
या शाखेचा ब्रँच कोड 00300 असा असून आय.एफ.एस.सी. कोड SBIN0000300 असा आहे. हेच माझ्या वाढदिवसाला आपल्याकडून मला मिळालेले शुभेच्छा , गिफ्ट असेल ..

Comments

Popular posts from this blog

......पञकारीता सुरक्षित राहलेली नाही - जेष्ठ पञकार जोशी

देशात , महाराष्ट्रात पत्रकार क्षेत्र सुरक्षित राहिलेले नाही.पत्रकारांची नोकरीच धोक्यात आली आहे. एका झटक्यात त्यांना नोकरीवरून् काढले जात आहे.इतकी भयावह स्थिती या क्षेत्राची झाली आहे. देशातील  पत्रकारांचे व कर्मचारी वर्गांचे  वेतन निश्चित करण्यासाठी मजिठीया आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती.या  आयोगाचा  आपला सादर केला.पण याप्रमाणे वेतन देण्यास वृत्तपत्र मालकांनी संघटीतपणे  नकार दिला. ते सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने  या आयोगाने केलेल्या शिफारशी प्रमाणे वेतन देण्याचा निकाल दिला. तरी वृत्तपत्र मालक हे मान्य करावयास तयार नाहीत. इतकेच त्यांनी नव्हे कंत्राटी पत्रकार व संपादक  नियुक्त करण्याचा सपाटा लावला. पण याही पत्रकारांना मजिठीया आयोगा प्रमाणे वेतन देण्याचे निर्देश न्यायालयाने  दिले.  त्यामुळे तर  वृत्तपत्र मालक अधिक बिथरले आहेत .त्यांनी तर आता कामचुकार असल्याचा ठपका  तसेच नोटबंदीचा फटका  बहाणा करत पत्रकार कर्मचाऱ्यावर कुऱ्हाड  चालवत आहेत. अनेक जणांचा बदलीच्या  माध्यमातून छळ केला जात आहे.जेणे करून त्या पत...

कशी असावी पञकारीता ........

समाजातील राजकीय,प्रशासकीय  क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका,       घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार??       घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार?    अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या,     कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार,      बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार?      लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय,     समाजाला किती कळतो पत्रकार?????    अरे विच...

पञकारीता धंदा झाला??

आजच्या भारतीय लोकशाहीत विधी पालीका , न्यायपालीका व कार्यपालीका या तिन्ही स्तंभा शिवाय चौथा स्तंभ म्हणून पञकारीतेचा उल्लेख केला जातो . पञकारीतेला एवढे महत्वाचे स्थान देण्यात आले आहेकी समाजात घडत असलेल्या घडामोडीचे वास्तव्य समाजातील लोकांन समोर आणून त्यातील उणीव , उजागार करण्याचे महत्वपूर्ण कार्य महाराष्ट्रातील पञकारांनी करावे अशी अपेक्षा सर्वांचीच असते .  याच लोकशाहीच्या माध्यमातून इंग्रजीकाळात   लोकमान्य टिळक , बाळ जांभेकर , पुथ्वीगीर गोसावि यांनी साप्ताहिक वृत्तपञाच्या माध्यमातून समाजाला आरसा बणविण्याचे महत्वपुर्ण काम केले .  मागील भुतकाळात वृत्तपञ चालकांनी वृत्तपञाच्या माध्यमातून भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले मात्र आजच्या धनदांडग्या युगात काही वृत्तपञ चालकांनी याच माध्यमातून त्या स्वातंत्र्यला सुराज्य करण्यासाठी याच साप्ताहिक , दैनिक व इलेक्ट्रानिक माध्यमाचा वापर केला नाही तर स्वातंत्र्याच्या स्वार्थासाठी राजकीय दलदल करून टाकला आहे.  आज पञकारीता परमोधर्म न राहता परमोधंदा बनला आहे. आज ग्रामीण पञकारांना थोड्या मानधनात वर्षागणपती वापरून त्यांना वेठबिगाराची व...