समाजातील राजकीय,प्रशासकीय क्षेत्रातील लोकांनो श्रमजीवी,ग्रामीण पत्रकारिता काय असते हे तुम्हाला ज्ञात आहे का? कोण असतो पत्रकार? कशी असते पत्रकारिता? थोडे कान इकडे करा ऐका, घरची भाकरी खाऊन जगाचा आरसा असतो पत्रकार?? घरदारावर तुळशीपत्र ठेवून,घरचे पैसे खर्चून,गावातील,परिसरातील प्रश्न त्याला तडीस नेण्यासाठी धडपडतो तो पत्रकार? अहो तुम्हाला वाटेल पगार असेल अहो कसला पगार आम्हाला साधे मानधन ही नसते,असले तर अगदी थोडके,बातमीच्या शोध,लेखन,वेळ,व बातमी पाठविणे,ती छापून येईपर्यंत वाट बघणे,अन दुसर्या बातमीच्या शोधला लागणे ही पत्रकारिता असते, हे समजून घ्या, कुठलाही आर्थिक आधार नसतांना बातमीला आपला श्वास समजतो पत्रकार, बातमी आल्यावर तिचे परिणाम भोगतो पत्रकार? लोकांच्या दूषणे,पुढारयांच्या नको त्या प्रश्नाला भिडतो पत्रकार, हे सर्व समाजासाठी भोगतो पत्रकार. हो हे लिहितो ना मी आहे तसाच, जो बातमीसाठी आयुष्य भर राबतोय, समाजाला किती कळतो पत्रकार????? अरे विच...
Comments