पत्रकार हा समाजाचा आरसा असून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, स्वातंत्र्यदिनी गिरणारे ता. जिल्हा नाशिक या गावात पत्रकारांना होणारी अरेरावी , शिवीगाळ , अनादर , व त्यांच्यावरील ग्रामसभेत हल्ला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली आहे .
या संपूर्ण ग्रामसभेच्या बैठीची सखोल चौकशीसाठी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन पाठवून स्थानिक पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले आहे .
तसेच स्वातंत्र्य दिनी पत्रकारांवरील हल्ला दुर्दैव नाही तर काय??
स्वातंत्र्याचा दिवस ग्रामसभेचा गोंधळ बघून " गावाकडे चला " म्हणणारर्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना ही अशी केंद्रित ग्रामव्यवस्था बघून दुःख होत असेल अशी भावना येथील जेष्ठ गावकर्यांनी व्यक्त केली.
स्वातंत्र्याचा दिवस ग्रामसभेचा गोंधळ बघून " गावाकडे चला " म्हणणारर्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना ही अशी केंद्रित ग्रामव्यवस्था बघून दुःख होत असेल अशी भावना येथील जेष्ठ गावकर्यांनी व्यक्त केली.
पत्रकारांवरील हल्ल्याची बातमी मिळताच अखिल भारतीय पत्रकार समन्वय समिती , पत्रकार संरक्षण समिती ( महाराष्ट्र ) ,जर्नालिष्ठ एक्टीविझम फोरम , दिंडोरी प्रेस क्लब ,शेतकरी संघटनांची सुकाणू समिती , शेतकरी वाचवा अभियान , वारकरी महामंडळ , शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था ,मावळा प्रतिष्टान , आम आदमी पार्टी , प्रहार संघटना , दिव्यांग दुर्गसंवर्धन , गरुडझेप प्रतिष्टान , स्वाभिमानी शेतकरी संघटना , छत्रपती सेना , महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हातून पत्रकार संघटना व पत्रकार , समाजीक संघटना कृती समिती , यांनी या घटनेबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला आहे .
श्री राम खुर्दळ व ज्ञानेश उगले या दोन्ही जेष्ठ पत्रकारांना पोलीस संरक्षण द्यावे .
हल्लेखोर हे खूनशी व राजकीय असल्याने पत्रकारांच्या जीवाला व कुटुंबियांना धोका असल्याने याबाबत पोलीस विभागाने संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Comments